Breaking News

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कागदावरच ! रुग्णांच्या भारामुळे शासकीय आरोग्यसेवाच कोलमडली

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कागदावरच ! रुग्णांच्या भारामुळे शासकीय आरोग्यसेवाच कोलमडली

उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा खर्च मागील १५ वर्षांच्या कामाच्या विलंबामुळे ५८ कोटी खर्चाचे काम ८२.५४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यातच सिडकोने रुग्णालयासाठी दिलेल्या ५९०० चौमी जागेपैकी ९८० चौमी जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे. वर्षभरातही सीआरझेडच्या जागेचाही तिढा सुटलेला नाही. यामुळे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम अद्यापही कागदावरच आहे. उरणच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या संख्येत वाढ झालेली नाही. याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेत होत असुन रुग्णांना उठसूठ उपचारासाठी नाहक नवीमुंबई, पनवेल, मुंबईची वाट धरावी लागत आहे. यामुळे उरणची आरोग्यसेवाच कोलमडली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उरण परिसरात जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, रासायनिक प्रकल्प आणि त्यावर आधारित शेकडो कंटेनर यार्ड कार्यरत आहेत. जेएनपीए बंदरातुनच ८० लाख कंटेनर मालाची आयात निर्यात होते. प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या मालवाहतूकीमुळे देशाला व्यापारातून दरवर्षी सुमारे ७५-८० हजार कोटी महसूल मिळवून देणाऱ्या उरणला उरणकरांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाला १५ वर्षांतही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारता आलेले नाही. उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वाहतूकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्यामानाने उरणमधील असलेली उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी अपुरे पडतात. आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सिडकोने रुग्णालयासाठी बोकडवीरा गाव हद्दीत ५९०० चौमी भुखंड दिला आहे. या भुखंडावर नियोजित रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली होती. शासनाने यासाठी १५ वर्षांपूर्वी ५२ कोटी रुपये निधीही मंजूर केला होता. मात्र सिडकोने दिलेल्या भुखंडावरील ९८० चौरस मीटर जागेवर खारफुटीची झाडे उगवल्याने १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सीआरझेडच्या कचाट्यात सापडले आहे. सीआरझेडचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठपुरावा करूनही तीढा सुटलेला नाही.यामुळे कामाला विलंब होत चालला आहे.मात्र १५ वर्षात कामाला सातत्याने झालेल्या विलंबामुळे या कामाचा खर्च ५८ कोटी खर्चाचे काम ८२.५४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याची माहिती उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली. मागील १५ वर्षांपासून उरणमध्ये १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे स्वप्न साकार झालेले नाही. याला बऱ्याच अंशी येथील लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडल्याने रुग्णसेवेचा ताण उरणमधील असलेल्या उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडत आहे. त्यामुळे हे दोन्ही आरोग्य केंद्र वाढत्या रुग्णांसाठी अपुरे पडतात. त्यातच इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या आहेत.भेडसावणाऱ्या अनेक उणीवांमुळे रुग्णांना उपचारासाठी नवीमुंबई, पनवेल, मुंबईची वाट धरावी लागत आहे.


Most Popular News of this Week

तलावांमधील पाण्याचा...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...

सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...

| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...

नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...

... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...

उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...

भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...