Breaking News

खारघरनोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

खारघरनोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे दि.७ एप्रिल रोजी खारघर नोड से - १०,११ व १८ येथील भूखंडावरील अनधिकृत स्टॉल्स, भंगाराची दुकाने, लोखंडी पत्राशेड व झोपडपट्टी इत्यादी बांधकामे निष्कासीत करून अंदाजे ३६०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड मोकळा करून घेतला आहे. खारघरनोडमधील उपरोक्त नमूद अनधिकृत बांधकामे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून व सिडको महामंडळाकडून कोणत्याही स्वरूपाची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्यामुळे ती निष्कासीत करण्यात आली आहेत. सदरची कारवाई नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, सिडको पोलिस पथक, सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आली.


Most Popular News of this Week

तलावांमधील पाण्याचा...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...

सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...

| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...

नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...

... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...

उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...

उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...

भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...