वाशीतील 'त्या' सोसायट्यांच्या बेकायदा 'एनओसी' रद्द करा !
वनमंत्री गणेश नाईकांचे वाशीतील नैवद्य, अलबेला सोसायटीसंदर्भात अग्निशमन अधिकाऱ्यांना निर्देश वाशी (प्रतिनिधी) – वाशीतील नैवद्य को.ऑप हौ. सोसायटी, अलबेला को.ऑप हौ. सोसायटी सेक्टर- ९ या गृह संस्थाना दिलेल्या फायर एनओसी रद्द करण्यात याव्यात यासाठी काल जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांनी अग्नीशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांचा चांगलाच समाचार घेतला. कुणाच्या सांगण्यावरुन ही एनओसी दिली अशी विचारणा यावेळी गणेश नाईक यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे यांनी याविषयी जनता दरबारात तक्रार केली असता नाईक यांनी अग्नीशमन अधिकाऱ्यांना दरबारात बोलावून घेतले. आपल्या शेजारी दरबार असून सुद्धा आपण इथे हजर नाही. दरबारात गैरहजर रहायला कुठे आग लागली होती का अशी विचारणा करून तुम्ही इथे गोल गोल उत्तर देऊ नका, उद्या महापालिका तुम्हाला घरी पाठवेन असा इशारा दिला. यावेळी तक्रारदार सुरेश शिंदे यांनी गणेश नाईक यांना निदर्शनास आणून दिले की आपण लेखी तक्रार दिली असताना आणि सदर इमारतींचे प्रकरण न्यायालयात प्रलंबीत असताना ही फायर एनओसी देण्यात आली. यावर अग्नीशमन अधिकारी यांनी सदर एनओसी देण्यासंदर्भात सहाय्यक नगररचना अधिकारी केकाण यांचा संदर्भ दिल्याने नाईक यांनी केकाण यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले. आजच्या आज यावर निर्णय घ्या एनओसी योग्य असेल तर मला स्पष्ट करा आणि चुकीच्या मार्गाने दिली असेल तर रद्द करा अशा सूचना त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना दिल्या. अधिकार्यांनी येस बॉस, येस बॉस करत चुकीचे निर्णय यापुढे घेऊ नयेत असेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देशित केले. सहा. नगररचनाकार सोमनाथ केकाण यांच्या सांगण्यावरुन जर अग्निशमन अधिकारी चुकीच्या पध्दतीने एनओसी देणार असेल तर आता चुकीची दुरुस्ती करा, सोमनाथ केकाण हा काय मंत्र्यांपेक्षा मोठा झालायं का? अशा शब्दात काल जनता दरबारात गणेश नाईकांनी आपला संताप व्यक्त केला.
Most Popular News of this Week
तलावांमधील पाण्याचा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...
सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...
| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...
नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...
... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...
उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...
उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...
भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...
