मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची नवी मुंबई मुख्यालयास भेट
भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी काल मनसे नगरसेवक व गटनेते अभिजीत देसाई यांच्या दालनाचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर त्यांनी महापौर सुजाता पाटील आणि सभागृह नेते सागर नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. महापौरांनी यावेळी शर्मिला ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी चर्चेत शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई शहराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रशंसा करत पुण्यापेक्षा हे शहर अधिक राहण्यालायक असल्याचे स्पष्ट केले. अशोक खरातसारख्या भोंदू बाबांविषयी आपले मत स्पष्ट करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ज्यावेळी आमचे १३ आमदार निवडून आले होते, त्यावेळी आमच्याकडे किती तरी माणसे येत होती. आता मी त्यांची नावे घेणार नाही. ती सर्व भोंदूबाबांसारखी लोक होती. मी त्यांना भोंदूबाबा म्हणते, मात्र ते स्वतःला स्वयंघोषित ब्रह्मा-विष्णु-महेश, विष्णु - लक्ष्मी - पार्वती असे काहीही बोलत होते. मात्र, मी आणि राज ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, तुम्हाला आम्हाला भेटायला यायचे आहे तर या, मात्र आम्ही तुमच्या पाया पडणार नाही. इतकेच नाही तर आमच्यासोबत फोटो काढून आम्ही तुमचे भक्त आहोत, असे सांगितले तर आम्ही तुम्हाला तिथे येऊन ओवाळणार आणि कानफटवणार असे सांगायचो. त्यामुळे आमच्याकडे कोणी येत नाही आणि आम्ही कोणाकडे जात नाही, असे परखड भाष्य शर्मिला ठाकरेंनी केले. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की, भोंदूबाबाकडे जाऊ नका. खरात प्रकरणातील व्हिडीओ तुम्हीही पाहिले असतील. कोणती बाई अशी आहे जी त्यामध्ये बेशुद्ध दिसत आहे. म्हणजे नक्की काय सुरू आहे? आपला समाज कुठे चालला आहे ? महाराष्ट्र समाजसुधारक राज्य आहे. त्याची लिस्ट सुद्धा आहे. संतापासून, हुशार माणसांपासून, शास्त्रज्ञांपासून साहित्यिकांपर्यंताची. त्यामुळे लोक वेडे झाले आहेत का ? हे कळत नाहीये. हा भोंदूबाबा काय त्यांच्या नवऱ्यांना प्रमोशन मिळवून देणार होता का? काय बदल्या करणार होता? असे म्हणत शर्मिला ठाकरेंनी भोंदूंकडे जाणाऱ्या लोकांचेही कान टोचले आहेत. राज्यात गेल्या महिन्याभरापासून नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने धुमाकूळ घातला आहे. स्वतःला देव असल्याचे सांगत भोंदू अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आणि अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आता उघड झाली आहे. खरातवर सध्या नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून १२ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ९ गुन्ह्यांचा एसआयटी तपास करत असून २ गुन्हे नगर पोलीस आणि १ गुन्हा नाशिक शहर पोलिसांकडे आहे, अशी माहिती मंगळवारी (ता. ७ एप्रिल) पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी प्रसार माध्यमांना दिली. या घटनेबाबत राज्यातून तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी परखड आणि स्पष्ट भाष्य केले आहे.
Most Popular News of this Week
तलावांमधील पाण्याचा...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या...
सिडकोचा १६ हजार २५० कोटींचा...
| अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर विशेष भर... |...
नवी मुंबई महापालिकेच्या ६९०४...
... नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत...
उरणमधील १०० खाटांचे उपजिल्हा...
उरण (प्रतिनिधी) उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंची...
भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे केले आवाहन नवी मुंबई (प्रतिनिधी) –...
