Breaking News

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे शटडाऊन

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे शटडाऊन

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या ६०० मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ पर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन व इतर विविध तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...