पाणी बिल वसुलीसाठी ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरू
पाणी बिल वसुलीसाठी ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरू
ठाणे (वार्ताहर) - ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, मीटर रुम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज) १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर १०० टक्के इतकी भरीव सवलत असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत पाणीबिल भरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. जे नागरिक आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती कारवाई सुरू आहे. तरी नागरिकांनी पाणी बिल भरुन कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
