Breaking News

भिवंडी मनपातर्फे अभय योजनेस पुनश्च १००% व्याज माफी; १००% वसुली करा!

भिवंडी मनपातर्फे अभय योजनेस पुनश्च १००% व्याज माफी; १००% वसुली करा!

करविभागाच्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त यांच्या कर्मचाऱ्यांना सुचना

भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी महापालिकेत कर विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये अभय योजनेस मिळालेला प्रतिसाद पाहता महानगरपालिकेने फेब्रुवारी, २०२६ पासुन पुन्हा एकदा १००% व्याज माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जास्तीत जास्त माहिती थकबाकीदारांपर्यंत पोहचविण्यासह १००% वसुली करावी अशा सक्त सुचना अतिरीक्त आयुक्त नयना ससाणे यांनी आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांना दिल्या.

भिवंडी निजामपूर शहर महापालिकेतर्फे नाव्हेंबर २०२५ मध्ये कर वसुलीमध्ये वाढ होण्याकरिता अभय योजना लागू केली होती. या कालावधीमध्ये नोव्हेंबर २०२५ मध्ये १००%, डिसेंबर २०२५ मध्ये ७५% तर उर्वरीत कालावधीसाठी ५०% सुट देण्यात आली होती. नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये अभय योजनेस मिळालेला प्रतिसाद पाहता महानगरपालिकेने फेब्रुवारी, २०२६ पासुन पुन्हा एकदा १००% व्याज माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांचे निर्देशानुसार अतिरीक्त आयुक्त नयना ससाणे यांनी उपायुक्त (कर), बाळकृष्ण क्षिरसागर यांचे समवेत कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली. या बैठकीमध्ये अतिरीक्त आयुक्त नयना ससाणे यांनी एकूण मागणी, वसुल रक्कम व शिल्लूक मागणी याचा सविस्तर आढावा घेतला.

भिवंडी महापालिकेने पुन:श्च १००% व्याज माफीची सवलत दिली आहे. त्याची जास्तीत जास्त माहिती थकबाकीदारांपर्यंत पोहचविण्यात यावी आणि १००% वसुली करावी अशा सक्त सुचना अतिरीक्त आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, यापुढे प्रत्येक १५ दिवसांत वसुलीबाबत आढावा घेण्यात येईल. ज्या वसुली लिपीकांची वसुलीची टक्केवारी कमी असेल त्यांचेवर अत्यंत कठोर कारवाईचा इशाराही अतिरीक्त आयुक्त नयना ससाणे यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. या बैठकीस कर मुल्यांकन विभागाचे प्रमुख सुधीर गुरव, सर्व प्रभागाचे कर निरीक्षक, कर वसुली लिपीक हे उपस्थित होते.


Most Popular News of this Week