व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थिती बदला!
व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थिती बदला!
ठाणे मनपा उपायुक्त डॉ.मिताली संचेती यांचे प्रतिपादन
ठाणे (वार्ताहर) - क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता, कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण असो की, शिक्षण क्षेत्र.नियमित अभ्यास आणि मेहनत घेतली तरच परिस्थिती बदलते असे मार्गदर्शनपर वक्तव्य ठाणे महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी नुकतेच एका प्रशिक्षण कार्यक्रमात केले. ठाणे महापालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या एसी, रेफ्रिजरेटर,वॉटर कुलर या उपकरणांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना पदवीप्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नौपाडा येथील पालिका शाळा क्र १९ येथील रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळा क्रं.१९, विष्णुनगर, ठाणे (प) येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलेले आहे. पहिल्या टप्प्यात ११ मुलानी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तीन महिन्याचे हे प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना नोकरी व व्यवसायसाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केले जाते. यावेळी ठाणे महापालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली. रोटरीने सुरू केलेला हा उपक्रम एक अभिनव असा उपक्रम असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असे डॉ. मिताली संचेती यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे प्रांतपाल हर्ष माकोल हे होते. ठाणे महापालिकेचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ब्लू स्टार ट्रेनिंग सेंटरचे मॅनेजर हरीश आदींसह नियोजित प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, माझी प्रांतपाल डॉ.मोहन चंदावरकर, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे नोर्थच्या अध्यक्षा ममता वंजानी, जगदीश चेलारमानी, प्रशांत पात्रो,मेधा जोशी,देवयानी वेद,सुनील सोमण राजेश परांजपे, नियोजित अध्यक्ष निशा कपीला, यतीन कोळंबेकर आणि अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
