Breaking News

कोपरी परिसरातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरी परिसरातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे (वार्ताहर)- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहिम नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली आज नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत येत असलेल्या कोपरी परिसरात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली.  सकाळी ७.३० वा.अष्टविनायक चौकातून स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. कर्तव्य आज, मग पदाचा चार्ज असे नमूद करीत उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही मोहिम संपूर्ण ठाणे शहरात अधिक व्यापक प्रमाणात राबविणार असून या मोहिमेत ठाणेकरांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगरअभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक शंभूराज कांबळे, मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, चारू घुट्टे आदी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अष्टविनायक चौकातून या मोहिमेस प्रारंभ झाला, त्यानंतर कोपरी गाव, कन्हैया नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच बारा बंगला या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कचरा संकलन व साफसफाईबरोबरच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यासाठी (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेत नागरिक देखील उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते.  पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, नानीक इंग्लिश स्कूल, श्री मा बालनिकेतन, विद्यासागर एज्युकेशन सोसायटी, जीवन ज्योती इंग्लिश मीडियम, इत्यादी शाळेचे शिक्षक व प्रत्येक शाळेचे ५० विद्यार्थी स्वच्छता अभियान मध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सहभागी होते. या मोहिमेसाठी जेटिंग गाडी, पाण्याचे टॅंकर, सीएनडीच्या २ गाड्या, जेसीबी डंपर तसेच कचरा उचलण्यासाठी ३ आरसी कॉम्पॅक्ट १० घंटा गाड्या तसेच ७०० सफाई कर्मचारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...