Breaking News

खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्या!

खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्या!

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देश

ठाणे (वार्ताहर) - जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत तातडीने उपायोजना राबविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या बैठकीत आयुष्यमान कार्ड समिती, १५ वित्त आयोग आढावा बैठक, जिल्हास्तरीय नियमित लसीकरण टास्क फोर्स समिती, जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियत्रंण समिती, वातावरणीय बदल व मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध व पुनर्विलोकन समितीमार्फत या विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत वातावरणीय बदल व मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टाकफोर्स समितीमार्फत दर सहा महिन्यांनी प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, वातावरणीय बदल यामुळे उद्पवणाऱ्या श्वसनाच्या व त्वचेच्या आजारांबाबत प्रदूषण मंडळाने आरोग्य विभागास माहिती दिल्यास त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यास मदत होईल. प्रदूषण कमी करण्यासाठी सध्याच्या काळात विद्युत वाहनांचा वापर, प्लास्टिक बंदी, मास्कचा वापर यासंबंधी अधिक चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाने वेळोवेळी लसीकरण करावे, वन्यप्राणी विषयक आजाराविषयक वन्यप्राणी विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे तसेच सर्व नरगपालिका आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...