Breaking News

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन

ठाणे (वार्ताहर) - ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि ठाणे जिल्हा स्त्री रोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय रुग्णालयात केले होते. शंभरहून अधिक स्त्री रोग तज्ञ उपस्थित असलेल्या कार्यशाळेमुळे नवोदित डॉक्टरांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कशा पद्धतीने केल्या जातात याचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमास राजीव गांधी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध माळगावकर आणि टीओजीएसचे अध्यक्ष डॉ महेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्जिकल कार्यशाळेत पारंपारिक पद्धतीने गर्भपिशवी काढायच्या व्हजायनल हिस्टरेक्टॉमी, लेझर मार्फत केली जाणारी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, गर्भ पिशवीची गाठ काढायची, मायोमेक्टोमी ऑपरेशन अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात आल्या. या कार्यशाळस शल्य विशारद डॉ वनिता राऊत, डॉ राजेंद्र सकपाळ, डॉ उद्धव राज, डॉ सुयश नवल, डॉ जयनारायण सेनापती आणि डॉ रेखा थोटे हे उपस्थित होते. ठाणे स्त्री रोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ महेश जोशी, सचिव डॉ नागेधरी नंदा, खजिनदार डॉ नुपूर मित्तल तसेच त्यांचे कार्यकारणी सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. स्त्री रोग विभागाचे प्रमुख डॉ जयनारायण सेनापती तसेच त्यांचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मिसबा मुल्ला, डॉ सुनिता उबाळे, डॉ ममता आनंद आणि हॉस्पिटलचे सर्व निवासी डॉक्टरांचे सहकार्य लाभले.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...