Breaking News

ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे ५ जानेवारी रोजी आयोजन

ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे ५ जानेवारी रोजी आयोजन

२२ डिसेंबर पूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन

          ठाणे - ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार०५ जानेवारी२०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच २२ डिसेंबर पूर्वी त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवननागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदना सोबत प्रपत्र-१ (ब) सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र-१ (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

          महाराष्ट्र शासनसामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्र. प्रसुधा-१०९९/सीआर-२३/९८/१८-अदिनांक २६ सप्टेंबर २०१२ नुसार माहे डिसेंबर- २०१२पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्विकारताहे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

          मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्येपरिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेततसेच ज्या निवेदनावर १ महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाहीअशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

         अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावीएकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयकविविध न्यायालयातलोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारीमाहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणेतसेच राजकीय पक्षाच्यानगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्जअंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहेअशा प्रकरणी केलेला अर्जतक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीतयाची नोंद घ्यावी.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...