प्रारूप मतदार यादीतील हरकतींच्या तपासणीसाठी मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांची स्थळ भेट...
प्रारूप मतदार यादीतील हरकतींच्या तपासणीसाठी मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांची स्थळ भेट...
विसंगती तातडीने सुधारून मतदार यादी तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश...
भाईंदर (वार्ताहर) - प्रारूप मतदार यादीच्या संदर्भात प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची सखोल पडताळणी करण्याच्या उद्देशाने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा यांनी इंद्रलोक फेस ६ आणि हटकेश परिसरातील विविध इमारतींना प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित हरकतदार तसेच नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची माहिती जाणून घेण्यासह तपासली.
दरम्यान, स्थळीच मतदार नोंदींची पाहणी करून, प्रत्येक मतदाराची नोंद त्यांच्या वास्तव प्रभागानुसार अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयुक्त यांनी नमूद केले. पडताळणीदरम्यान आढळणाऱ्या विसंगती तातडीने सुधारून मतदार यादी तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त (मुख्यालय) डॉ. सचिन बांगर, उपायुक्त कविता बोरकर, नगरसचिव दिनेश कानगुडे, सहाय्यक आयुक्त आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासन नागरिकांना आवाहन करते की, प्रारूप मतदार यादीतील आपली माहिती नीट तपासावी व काही हरकत किंवा सूचना असल्यास दिनांक ३ डिसेंबर २०२५ पर्यंत मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला.कर विभाग, स्व.इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,भाईदर ( पश्चिम) येथे दाखल करावी. नागरिकांनी आपली मतदार नोंद ही निवडणूक प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, अचूक मतदार यादी तयार करण्यात प्रत्येक नागरिकाचा सहकार्यपूर्ण सहभाग आवश्यक आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मतदार सहाय्यक केंद्रांद्रारे नागरिकांना संपूर्ण मार्गदर्शन मिळेल असे आयुक्त यांनी सांगितले.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
