Breaking News

चालू वर्षाच्या मागणीसह थकीत पाणी बिल भरणाऱ्यांना प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट

चालू वर्षाच्या मागणीसह थकीत पाणी बिल भरणाऱ्यांना प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट

ठाणे (प्रतिनिधी) - पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड / व्याज) १०० टक्के सूट लागू करण्यात अरल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी काल दिली. थकीत पाणीपट्टी बिलावर १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहिर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सोरभ राव यांनी केले आहे.

ही योजना दि.१ डिसेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये (दंड, व्याज)१०० टक्के सूट ,सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. तसेच जे नागरिक दि.३१/०३/२०२६ आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती अशी कारवाई होईल असे आयुक्त यांनी यावेळी नमूद केले.

या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावधी होणेसाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत व सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले आहे.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...