Breaking News

नाशिक टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण..... बजरंग दलाची कोकणभवन येथे निदर्शने

नाशिक टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण..... बजरंग दलाची कोकणभवन येथे निदर्शने

बेलापूर (वार्ताहर) - नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित धार्मिक धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी बजरंग दलाने काल दि.१७ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार काल नवी मुंबईतील कोकण भवन येथे कोकण विभागीय आयुक्तालय कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र स्वरूपाची निदर्शने केली. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या युनिटमध्ये झालेल्या कथित धार्मिक धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी बजरंग दलातर्फे करण्यात आली. यावेळी नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कोकण भवन येथे एकत्र येवून लव्ह जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने कोकण विभागीय आयुक्तांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, विविध क्षेत्रांमध्ये पद्धतशीरपणे लव्ह जिहाद आणि कॉर्पोरेट क्षेत्रात अल्पसंख्याक गटांना अनुचित लाभ दिला जात आहे, तसेच हिंदू कुटुंबांवर अत्याचार होत असल्याचे नमूद केले.


Most Popular News of this Week