नियोजनबध्द विकासकामांमुळे बेलापूरगावाची वाटचाल स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने !
नियोजनबध्द विकासकामांमुळे बेलापूरगावाची वाटचाल स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने !
आ.मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून विकासकामांना सुरुवात बेलापूर (वार्ताहर)- बेलापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्या सहकार्याने विविध विकासकामांना वेग देण्यात येत असून बेलापूर गाव आता स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करत आहे. गावामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेण्यात आली असून, यातील काही कामे पूर्णत्वास जात आहेत. यासंदर्भात आ. म्हात्रे यांनी दिलेल्या विकासकामांच्या महितीनुसार बेलापूर गावांमध्ये अमृतेश्वर तलावासमोरील सभामंडपाच्या आवारात काँक्रीटीकरण (रु. ३५ लाख), बेलापूर गाव येथे अमृतेश्वर तलावासमोर सभामंडप (रु.१५ लाख), बेलापूर गाव येथे ब्रिज खालून रस्ता तयार करणे (रु. ७५ लाख), बेलापूर गाव सेक्टर - २० येथे भाजी मार्केट (रु. ५० लाख), बेलापूर येथील मच्छीमार्केट लगत संरक्षण भिंत उभारणे (रु. २४ लाख), बेलापूर विभागातील बेलापूर गाव येथे क्रीडा संकुल उभारणे व इतर समाज उपयोगी कामे करणे (रु. १८ कोटी), बेलापूर गाव येथे भूखंड क्र. बी ३२, बी ३३ शेजारील जागेवर खेळाचे मैदान, पार्किंग इमारत, तलावाचे शुशोभीकरण, गाळे बांधणे, बहुद्देशीय इमारत, मार्केट उभारणे, बेलापूर गावातील कुस्तीच्या मैदानावर आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, बेलापूर येथील शहाबाज-बेलापूर रेल्वे पटरी ते से- १५ रेजेन्सी टॉवर पर्यंतच्या नाल्याच्या दोन्ही बाजूस कॉक्रिटीकरण करून अनुषंगिक कामे करणे, न.मुं.म.पा. प्रथम संदर्भ रुग्णालय बेलापूर येथील माता बाल रुग्णालयास अँम्बुलंस पुरविणे (रु. १६ लाख), न.मुं.म.पा. प्रथम संदर्भ रुग्णालय बेलापूर येथील माता बाल रुग्णालय यांना आय.सी.यु. व्हेंटीलेटर पुरविणे (रु. १६ लाख), न.मुं.म.पा. शाळा क्र. १ बेलापूर गाव या शाळेला जिओमेट्रीकल बॉक्स (रजि. ट्रेडमार्क) हे अध्यायन साहित्य देणे (२ नग) (रु. २.४० लाख), न.मुं.म.पा. शाळा क्र. १ बेलापूर गाव या शाळेला मायक्रोसॉफ्ट बॉक्स (रजि. ट्रेडमार्क) हे अध्यायन साहित्य देणे, (२ नग) (रु.२.४० लाख), बेलापूर मतदार संघातील शहाबाज, बेलापूर - से २० येथे ओपन जिम उभारणे व इतर स्थापत्य कामे करणे (रु. २० लाख), बेलापूर विभागातील किल्ले गावठाण येथे सीट आऊट लगत स्टील रेलिंग उभारणे (रु. ७ लाख), बेलापूर विभागातील नागा गणा पाटील उद्यान येथे निवारा शेड उभारणे (२५ लाख), बेलापूर मतदार संघातील आयकर कॉलनी, सीबीडी से -२१, काँक्रीटीकरण करणे व इतर स्थापत्य कामे करणे (रु. ३५ लाख), बेलापूर विभागातील से- १५, येथील जॉगिंग ट्रक शेजारी साई विहार व मारुती पॅराडाईस समोर ओपन जिम व इतर स्थापत्य काम करणे (रु. २० लाख), बेलापूर से-१५ येथील ब्रिज खालील भूखंडाचे सौंदर्यकीकरण करणे (रु. ४ कोटी), रस्त्यांचे मजबुतीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट्स, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण तसेच डिजिटल सुविधा यांसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकंदरीत या सोयीसुविधा व विकासकामांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध राहण्यावर आमदार मंदा म्हात्रे यांचा कायम भर राहिला आहे. त्यापैकीच बेलापूर गावाला आदर्श स्मार्ट व्हिलेज बनवण्याचा त्यांचा हा संकल्प आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या विकासकामांमुळे बेलापूर गाव लवकरच एक आदर्श व आधुनिक गाव म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
