कळंबोलीतील अनधिकृत झोपड्यांसह शेड स्टॉल्सवर पनवेल महापालिकेची तोडक कारवाई
कळंबोलीतील अनधिकृत झोपड्यांसह शेड स्टॉल्सवर पनवेल महापालिकेची तोडक कारवाई
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्त
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून पनवेल महापालिका हद्दीतील अनधिकृत झोपड्यांसह, शेड, स्टॉल्सवर मोठी तोडक कारवाई करण्यात येत आहेत. या कारवाईच्या अनुषंगाने नुकतेच कळंबोली प्रभाग समिती ब मधील सेंट जोसेफ शाळेजवळ बऱ्याच दिवसापासून उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांवर नोटीस लावून सदरील वाहनांवर कारवाई करून २ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे सेंट जोसेफ कळंबोली येथे होणारी ट्राफिक कमी होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे सेंट जोसेफ शाळेजवळील अनधिकृतपणे वाहनांमधून फळ विकणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ०३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. कळंबोली मधील केएलई महाविद्यालय समोरील मुख्य रस्त्यावरील अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री करणारे व वारंवार सूचना देऊनही न हटणाऱ्या स्टॉल धारकांवर अतिक्रमण पथकामार्फत कारवाई करण्यात आली. कळंबोली प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिक्षक राजेश डोंगरे,अतिक्रमण पथकातील सुपरवायझर, कर्मचारी, एमएसएफचे सुरक्षारक्षक उपस्थित होते.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
