Breaking News

तुर्भेगावात एक गाव एक होळी उत्साहात संपन्न

तुर्भेगावात एक गाव एक होळी उत्साहात संपन्न

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तुर्भेगावात एक गाव एक होळीची गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गावातील ही एकात्मता दृढमूल व्हावी या जाणिवेतून गेली नऊ वर्षांपासून फोर्टी प्लस क्रिकेट व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने तुर्भे गावात एक गाव एक होळीची जुनी परंपरा पुन्हा सुरु झाली. काल उत्साहात संपन्न झालेल्या या होळीकोत्सवात गावातील जुन्या रुढी परंपरा साजऱ्या करताना सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. तांदळाच्या पापड्या, करंज्या व पुरणपोळीचे नैवद्य आणि साखरेच्या माळा होळीला अर्पण करण्यात आल्या तर रात्री पारंपरिक नागेली नृत्यावर फेर धरीत आबाळ वृद्धांनी एकीचे दर्शन करुन दिले. या नंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची ,चमचा लिंबू स्पर्धा आदी विविध कार्यक्रम पार पडले. या स्पर्धांमध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गावचे मानकरी बाळारामबुवा मंगल पाटील, चंद्रकांत गोपीनाथ पाटील यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करुन होळीला अग्नी दिला. यावेळी सर्व गाव गुलालात न्हाऊन निघाला होता. यावेळी नवीन जावई बापूंचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष असा सन्मान करण्यात आला.



Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...