एनआरआय वसाहतीजवळ आरसीसी नाल्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम... !
राष्ट्रवादी (अप) जिल्हाध्यक्ष भरत जाधवांची आयुक्तांकडे तक्रार; अनावश्यक बोगस कामांच्या चौकशीची मागणी
बेलापूर (वार्ताहर) - एनआरआय वसाहतीजवळ दोन्ही बाजूंनी पाणी निचरा करण्यासाठी सिडकोने नैसर्गिक नाला दिलेला असताना सदरठिकाणी ३ कोटींचा खर्च करून अनावश्यक आरसीसी नाल्याबाबत निकृष्ट दर्जाचा बांधण्याचे काम सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली असून, अनावश्यक बोगस कामांच्या चौकशीची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे ज्या भ्रष्ट उपअभियंता याच्या निगरानीखाली से- ५० मध्ये जुने अनावश्यक व वोस नाल्याचे काम हाती घेतले होते, त्या संबंधित उपअभियंता यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवालामध्ये विभागीय चौकशीचे आदेश दिले होते, त्याच उपअभियंता याने सदरचे हे काम प्रस्तावित केल्याचे भरत जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. या कामास आयुक्त यांच्यासह शहर अभियंता यांनी अनावश्यक कामास मंजुरी दिली, ही दुर्दैवी बाब असल्याचे नमूद केले आहे. याबाबत उपरोक्त अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अशा अनावश्यक झालेल्या बोगस कामांची चौकशीची मागणी का करू नये? असा सवाल भरत जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच सदर जागेची स्थळ पाहणी करून सदर एनआरआय वसाहतीजवळ आरसीसी नाल्याचे झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम पुनः तोडून दर्जदार करण्याबाबत सूचना करण्यासह अशा प्रकारची अनावश्यक प्रस्तावित केलेली उर्वरीत गटाराची कामे रद्द करावी अशी मागणी केली आहे. पालिका या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालते की काय अशी शंका यानिमित्ताने निर्माण होत असून या निवेदनाच्या प्रती त्यांनी अतिरिक्त आयुक्त १ व २, नवी मुंबई महापालिका शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांना दिल्या आहेत.
दरम्यान, ज्याठिकाणी सिडकोच्या नियोजनानुसार नैसर्गिक नाला आहे. अशा ठिकाणी 3 कोटी रुपये खर्च करून आपण आरसीसी नाले बनवितात व तशाच प्रकारची कामे प्रस्तावित करतात ही जनतेच्या पैशाची लूट नाही का? अनावश्यक कामांना जबाबदार अधिकारी मंजुरी देतात हे कितपत योग्य आहे. अशा चुकीच्या कामांची चौकशीची मागणी वरिष्ठ पातळीवर का करू नये असा सवालही उपस्थित केला आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
