सिडकोची अनधिकृत कंटनर यार्डवर तोडक कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत ११ फेब्रुवारी रोजी लॉजिस्टीक पार्क मौजे पौंडखार, सर्वे नंबर ३,४, व २३ येथे निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित/संपादित जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ १९ हजार चौ.मी. वरील कंटेनर, कंटेनर कार्यालय, पत्रा शेड, सिक्युरीटी केबिन इ. स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम पोकलेन च्या सहाय्याने तोडण्यात आले. हे अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले असल्यामुळे निष्कासित करण्यात आले. सदरची मोहीम मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी ५ लेबर , १ पोकलेन, १ ट्रक , १ जीप आदींचा वापर करण्यात आला.
