कळंबोलीतील नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम मुंबई विभागाने कारवाईची मोहिम पुन्हा एकदा तीव्र केळी असून, कळंबोली नोडमध्ये या विभागाने काल निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित जागेवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हखली. सिडकोच्या या कारवाईत, कळंबोली नोडमधील सेक्टर २३, भुखंड क्र. ३८ (पार्ट) येथील मार्बल व्यावसायिक दुकाने, ठ्रक् पार्किंग, इत्यादी तसेच सेक्टर २०, भुखंड क्र. ५ व ६ येथील ठ्रक्र पार्किंग, सेक्टर १६ए, भुखंड क्र. ५ व ६ येथील डीडीचा ढाबा व सर्विसिंग सेंटर तसेच टपरी, इत्यादी अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. सदरची ही नमूद अतिक्रमणे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली असल्यामुळे निष्कासित करण्यात आली असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येकी १ जेसीबी, ट्रक , टेम्पो, ४ जीप व २० कामगार असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.
