Breaking News

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 75 हजार दंड वसूली व 44.5 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 75 हजार दंड वसूली व 44.5 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त


नवी मुंबई - नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिक सहभागाकरिता सातत्याने जनजागृती करण्यात येत असून त्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक तपासणी दंडात्मक कारवाई मोहीमा सर्वत्र राबविण्यात येत आहेत. याबाबत केंद्रीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सूचना करण्यात आल्या असून त्यानुसार एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष मोहीमा राबविण्यात येत आहेतत्यानुसार 22 जानेवारी 2026 रोजी सर्व विभाग कार्यालय क्षेत्रात विशेषत्वाने फेरीवाले, मार्केट, दुकाने या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या एकल वापर प्लास्टिक तपासणी मोहीम प्रभावी रितीने राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून यामध्ये 5 व्यावसायिकांकडून रू.25 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 7 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये, तुर्भे विभागातील कारवाईत 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त तसेच घणसोली विभागातील कारवाईत 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 3.5 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त आणि परिमंडळ 2 च्या भरारी पथकामार्फत 2 व्यावसायिकांकडून 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1.5 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

यापूर्वीही जानेवारी महिन्यात 21 जानेवारीपर्यंत 10 फेरीवाले / व्यावसायिक यांच्याकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्याने त्यांच्याकडून एकूण 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच 37 किलो 500 ग्रॅम प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये, नेरूळ विभागातील कारवाईत 2 व्यावसायिकांकडून 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1.50 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा, वाशी विभागातून एका व्यावसायिकाकडून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा, तुर्भे विभागातील चार व्यावसायिकांकडून 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 18.500 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा, परिमंडळ 1 च्या भरारी पथकाकडून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2.50 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच परिमंडळ 2 च्या भरारी पथकाकडून रू. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली 14 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा 2 व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे आजच्या मोहीमेत 10 व्यावसायिकांकडून 50 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 37.500 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला पर्यावरणाला मोठया प्रमाणावर हानी पोहचत असून नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातून एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करावे. त्याकरिता कापडी पिशव्यांचा पर्याय स्विकारावा असे आवाहन करीत व्यावसायिकांनीही प्लास्टिक पिशव्या एकल वापर प्लास्टिक हे दुकाने / कार्यालये याठिकाणी ठेवू नये असे सूचित करण्यात येत आहे.

 


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...