सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीने घणसोली फुल्ल!
घणसोली (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे रिंगणात असणारे युवा नेते सौरभ शिंदे यांच्या प्रचार रॅलीच्या गर्दीने रविवारी सर्वांनाच अवाक् केले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना सौरभ शिंदे यांनी घणसोलीकरांसाठी एक सुसज़़ अधिक खाटांचे रुग्णालय, सीबीएससी अभ्यासक्रम शाळा अशा मुलभूत तसेच आवश्यक गरजांसाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही दिली. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. अशातच घणसोलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या घणसोळीतील सौरभ शिंदे यांच्या प्रभाग क्र. ९ या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी रॅलीत गर्दी केली होती. यावेळी सौरभ शिंदे म्हणाले की, कोणालाही कमी लेखत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे, योजना तसेच आमचे प्रभागासाठी असलेले व्हिजन यावर भर देऊन प्रचार करत आहोत. घणसोली विभागात रुग्णालयाची गरज आहे. प्रमोद पाटील म्हसकर तसेच सुरेश सकपाळ यांनी आरोग्य सुविधेसाठी भुखंड सिडकोकडून हस्तांतरीत करण्यात यश मिळविले आहे. त्यावर रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
