Breaking News

नवी मुंबईतील महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास शिवसेना-मनसे कारणीभूत!

नवी मुंबईतील महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास शिवसेना-मनसे कारणीभूत!

राष्ट्रवादी (शप) जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांचा आरोप

वाशी (वार्ताहर) - वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे फॅटास्टीया बिजनेस पार्क समोर नियंत्रण सुटलेल्या एका वकीलाच्या भरधाव कारने चारहून अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी कारच्या धडकेमुळे एका खाजगी कारसह इतर वाहनांचे नूकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातावेळी वकीलाच्या कारचालक हा मद्याधुंद अवस्थेत कार चालवित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. सदर अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेत वकीलाच्या कारच्या पुढील भागाचे नूकसान झाले आहे. ठाकरे बंधूंच्या नवी मुंबईतील दोन्ही पक्षांनी घेतलेल्या या भूमिकेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यासह महाविकास आघाडीत बिघाडी होण्यासाठी उपरोक्त दोन्ही पक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करतानाचा जागा वाटपात आम्हाला शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनी विश्वासत घेतले नसल्याचे सांगितले. शिवसेना व मनसेने घेतलेल्या या भूमिकेबाबत प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांनी सांगितले की, आमच्या पक्षाकडून ही बिघाडी झाली नाही. पत्रकारांकडून शिवसेना व मनसेमधील युतीबाबतची माहिती मिळाली. मात्र ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांना रूचलेली नाही. कारण या युतीनंतरही शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येवून प्रचार करत आहे, ही सुखावह बाब आहे. नैसर्गिक महाविकास आघाडी ही राष्ट्रवादी (शप), शिवसेना (उबाठा) व काँग्रेस या पक्षांची आहे. त्यामुळे कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्ये मनोमिलन झाले आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारची बिघाडी बाबतची घोषणा झालेली नसून कार्यकर्ते एकत्र काम करत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांनी मनसेबरोबर चर्चा करून जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्‍चित केला व त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्टवादी (शप) कांग्रेस व काँग्रेस बरोबर बैठक केली. त्यामुळे ही बिघाडी मनसेमुळे झाले की अन्य कारणामूळे हे शिवसेना जिल्हाप्रमुख यांनाच माहिती असावे असेही ते म्हणाले.


Most Popular News of this Week