Breaking News

पनवेलमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

पनवेलमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका निवडणूकीसाठी प्रशासन सज असून प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून कैलास पगारे यांची आणि निवडणूक निरीक्षक म्हणून मनिषा कुंभार (अप्पर जिल्हाधिकारी) यांची नेमणूक झाली आहे. निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत निवडणुकविषयक सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात घेतली. या बैठकीत निवडणूक विषयक झालेल्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी निवडणूक विषयक झालेल्या सर्व कामकाजाची संक्षिप्त माहिती निरीक्षकांना दिली. यामध्ये ईव्हीएम व्यवस्थापन, शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने केलेले नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि प्रशिक्षण, निवडणूक साहित्यविषयक तयारी, विविध पथके आणि नोडल अधिकाऱ्यांमार्फत केले जाणारे कामकाज याबाबत माहिती दिली. यावेळी निरीक्षकांनी निवडणूक विषयक विविध कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन विविध सूचना दिल्या. निवडणूक विषयक जबाबदाऱ्या पार पाडताना केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे सांगितले. मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) व्यवस्थापनाबाबत माहिती घेताना निरीक्षकांनी याबाबत झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, यंत्रांची सिलिंग व सुरक्षा, याबाबतचे रेकॉर्ड राखणे इत्यादी कामकाजाचा आढावा घेतला.

विशेष मतदान केंद्रे सथापन करताना आदर्श मतदान केंद, पिंक मतदान केंद्र, ग्रीन मतदान केंद्र याबाबत माहिती घेतली. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्रांवर केलेल्या सोईसुविधांवर चर्चा करताना सद्यस्थितीतील सोईसोबत दिव्यांग बांधवांसाठी अधिकचे तात्पुरते रॅम्प उभारले जाणार असल्याबाबत चर्चा झाली. आचारसंहितेचे कडक पालक करण्याच्या दृष्टीने खर्च, मद्य वाटप, अवैध वस्तूंची वाहतूक याबाबत स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ व्हीव्हिंग पथके, भरारी पथके या विविध पथकांच्या तसेच पोलीस विभाग, परिवहन विभाग, उत्पादन शुल्क विभाग या विविध विभागांच्या समन्वयाने चालू असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेतली. मतदानासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्य व्यवस्थापनाचा आढावा घेताना सर्व साहित्यविषयक तयार पूर्ण झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार तात्काळ साहित्य पुरवले जात असल्याचे सांगितले.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...