Breaking News

नवी मुंबईतील शिवसेनेच्या समितीने पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसले!

नवी मुंबईतील शिवसेनेच्या समितीने पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसले!

उमेदवारी नाकारल्यावरून माजी नगरसेवक संजू वार्डेंचा आरोप

माझे तिकीट कापले जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र.3 मधून शिवसेनेतर्फे(शिंदेगट) निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजू आधार वाडे हे इच्छूक होते व त्यासाठी त्यांनी निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासून तयारीही सुरु केली होती. मात्र असे असतांनाही ऐन वेळेला वाडे यांचे तिकीट कापण्याचाप्रकार घडला आहे.  दरम्यान, आपल्यावर झालेल्या या अन्यायाबद्दल माजी नगरसेवक संजू वाडे यांनी प्रसारमाध्यमासंमोर आपल्या भावना व्यक्त करतांना तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करतांनाच, उमेदवारी डावलण्यामागील कृत्याचे सर्व खापर ठाण्याचे खा.नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेच्या समितीवर फोडले आहे. माजी नगरसेवक संजू वाडे यांनी यावेळी केलेल्या आरोपावरून शिवसेनेत खळबळ उडाली आहे. उमेदवारी नाकारण्याच्या झालेल्या नाटयमय घडामोडीबाबत बोलतांना संजू आधार वाडे यांनी सांगितले की, मी २०१५ ची निवडणूक शिवसेनेतर्फे विद्यमान पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढलो होतो. तेव्हापासून त्यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षात काम करत आहे. मी एक उच्च शिक्षीत व महापालिकेत अधिकारी पदावर कार्यरत राहिलेलो असल्यामुळे तसेच यापूर्वी महापालिकेचे नगरसेवक भूषविलेळे आहे. एकंदरीत या सर्व बाबी पाहता,यावेळच्या महापालिका निवडणूकीत माझे तिकीट कापले जाईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र माझे थेट पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क असल्यामुळे नेमकी हिच बाब, जे खासदार सारखे लोक आहेत. त्यांना पोटदुखी होवून माझी उमेदवारी नाकारण्यात आल्याचा थेट आरोपही यावेळी माजी नगरसेवक संजू वाडे यांनी केला. फुले, शाहू, आंबेडकर आवाज हयाच ठिकाणी दाबू शकला जावू शकतो म्हणून माझे तिकीट नाकारले असेही त्यांनी नमूद केले. मी नगरसेवक पदी कार्यरत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय हाताळला. प्रभागात गटर मिटर ही कामे तर होतच असतांत. मात्र मनपाच्या माध्यमातून प्रभागात अद्यावत लायब्ररी तसेच जीम व हॉस्पीटलची व्यवस्था केली. घर घर संविधान हा नारा दिला. अशी विविध विकास कामे प्रभागात केलेली असतांनाही मला डावलण्यात आले याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र माझे नेते एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता. मात्र त्यांच्या पाठिशी उमेदवारी निवडीसाठी स्थापन झालेल्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या समितीने खंजीर खुपसले असा आरोपही त्यांनी केला. सदरची ही बाब मी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना सांगितले असता, त्यांनी माझ्या उमेदवारीबाबत खा. नरेश म्हस्के यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही तिकीट दिले. मात्र कोणाला दिले हे गुलदस्त्यात ठेवले व ज्या व्यक्तीने मागील पाच वर्षात सभागृहात प्रभागातील विषय मांडले नाहीत व डॉ.बाबासाहेबांचे कधी नावही घेतले नाही. अशा काम न करणाऱ्या व्यक्तीस उमेदवारी दिली याचा खेद वाटतो असेही संजू वाडे यांनी सांगितले. माझ्यावर झालेल्या अन्यायाची ही पध्दत चुकीची असून माझा समाज खा.म्हस्के यांना माफ करणार नाही असा इशाराही संजू वाडे यांनी यावेळी दिला. काही लोकांनी पैश्यांच्या लालचेने आपले स्वत:चे घर भरून घेण्यासाठी माझे तिकीट कापले असा आरोपही त्यांनी केला व हे मूर्खपणाचे लक्षण आहे हे येत्या काळात पक्षाच्या नवी मुंबईतील समितीला समजेल व त्यास समितीमधील काही लोक जबाबदार राहतील असेही त्यांनी नमूद केले. माझ्यावर पक्षाने अन्याय केला नाही. मात्र जी समिती आहे त्यांनी अन्याय केला असून मायबाप जनता बदला घेईल असे सांगत समितीच्या कार्यपध्दतीचाही वाडे यांनी निषेध नोंदविला.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...