Breaking News

ठाणे पोलिसांकडून आंध्रप्रदेशातील गांजा तस्करास अटक

ठाणे पोलिसांकडून आंध्रप्रदेशातील गांजा तस्करास अटक

६३८ किलो गांजासह २ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

ठाणे (वार्ताहर) - ठाणे गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आंध्रप्रदेश राज्यातील एका गांजा तस्करास अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल ६३८ किलो इतक्या गांजाच्या साठ्यासह एक कार असा एकूण २ कोटी १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (३६) रा. राज्य तेलंगना असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी की, ठाणे गुन्हेशाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना माहिती मिळाली होती की, एका कारमधून ओडीसा व तेलंगना (आंध्रपंदेश) राज्यातून गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणारा इसम हा हद्दीत येणार आहे. या माहितीनुसार पथकाने खारेगाव टोल नाक्‍्याकडून कळवा बाजूकडे जाणारे रोडवर, सापळा लावत, इन्होवा कारमधून आलेल्या चित्ना टागुर लक्ष्मण नायक यास पथकाने ताब्यात घेतले व कारची झडती घेतली असता त्याचेकडून २ कोटी ४ लाख १६ हजार रू. किमतीचा एकुण ६३८ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व १० लाख रु. किमतीची इन्होवा कार असा एकुण २ कोटी १४ लाख १६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चिन्ना याच्याविरोधात कळवा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अक्ट १९८५ चे कलम ८ (क), २०(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयात अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास दि.०३ जानेवारी २०२६ पर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, गुन्हे व सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, गुन्हे शोध २. ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली आहे.



Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...