Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कामकाजाचा पमपा आयुक्तांनी घेतला आढावा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कामकाजाचा पमपा आयुक्तांनी घेतला आढावा

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी काल दि.३० डिसेंबर महापालिका मुख्यालयात निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकित निवडणूकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला.

येत्या १५ जानेवारीला निवडणूक होणार असून या पार्थ्भुमीवरती ईव्हीएम मशीनची तपासणी, त्यासाठीचे मनुष्यबळ, याचा आढावा घेऊन सोयी सुविधांच्या अमंलबजावणी बाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. तसेच पनवेल महापालिकेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृहात सुरू आहे. याबाबतची आयुक्तांनी माहिती घेतली. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने तयार केलेल्या विविध पथकांच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूकी संबधित येणाऱ्या तक्रारींच्या निवारणाबाबत आयुक्तांनी मार्गदर्शन केले. निवडणूक काळात शांताता राखण्याच्यादृष्टीने अवैध दारू वाहतूक, अवैध वस्तू वाहतूक याबाबतीत आढावा घेताना आयुक्तांनी सांगितले की, पोलिस विभाग, वाहतूक पोलिस व परिवहन विभागाशी समन्व्य राखून काम करावे तसेच निवडणूकीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. प्रत्येक निवडणूक निर्णय कार्यालय व मतदान केंद्रावरती लागणाऱ्या सोयी सुविधांबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...