Breaking News

.तिकीट वाटपात समर्थकांना डावलण्यात आल्याने आ.मंदा म्हात्रे नाराज मात्र पक्षाच्या सोबतच राहण्याची भूमिका जाहीर

.तिकीट वाटपात समर्थकांना डावलण्यात आल्याने आ.मंदा म्हात्रे नाराज मात्र पक्षाच्या सोबतच राहण्याची भूमिका जाहीर

नवी मुंबई- नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिकीट तसेच ‘एबी’ फॉर्म वाटपात उघडपणे पक्षपात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून, काही ठराविक व्यक्तींनाच प्राधान्य देण्यात आले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

त्याचवेळी त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, संजीव नाईक आणि संदीप नाईक हे भाजपमधील नवखे आहेत. दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी न देता नव्याने आलेल्यांना तिकीट व ‘एबी’ फॉर्म देणे हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.


Most Popular News of this Week