कल्याण पश्चिमेत 10 प्रभागांसाठी शिवसेनेत 166 इच्छुकांनी दिल्या मुलाखती
कल्याण पश्चिमेत 10 प्रभागांसाठी शिवसेनेत 166 इच्छुकांनी दिल्या मुलाखती
कल्याण : कल्याण पश्चिमेतील साई हाँल वायलेनगर येथे शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, पदाधिकारी सुनील चौधरी आदी शिष्टमंडळाने शनिवारी घेतल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2026 या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपल्या पक्षातील इच्छुक उमेवारांच्या मुलखती घेत असतात. त्या मुलाखती मधून जे इच्छुक असतात, जे निवडून येण्यासाठी योग्य असतात, ते काम मुलाखती माध्यमातून सोपे होते. कल्याण पश्चिमेत 10 पँनल असून 166 इच्छुकांनी अर्ज भरले होते. त्यांच्या आज मुलाखत माध्यमातून, तसेच इच्छुकांचा आत्मविश्वास पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेले काम पाहता शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येतील असे सांगितले.
तर पक्षात बाहेरून आलेल्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमुळे शाखा प्रमुख, गट प्रमुख कार्यकर्ते नाराज असल्याचे विचारले असता, ही प्रक्रिया पूर्वी पासून सुरू आहे. निवडणूकी मध्ये कोण किती वर्षापासून काम करतोय, किंवा त्यांची योग्यता आहे का नाही, पंरतु निवडून येण्याच्या दृष्टीकोनातून कार्यकर्ता चांगलाच असतो. 20 ते 25 वर्षे पासून जे काम करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पंरतु या पँनल पध्दतीमध्ये निवडून येणे अत्यंत आवश्यक आहे, त्या बाबतीत विचार केला जातो. उमेदवारी बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे अंतिम निर्यण घेतील असेही गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केले.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
