जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भाजपचा डोलारा
जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांचे प्रतिपादन
नवी मुंबई (प्रतिनिधी) - येत्या दोन तीन दिवसांत महायुतीबाबतचा निर्णय होईल. आम्ही या निर्णयाची वाट पाहत आहोत असे सांगतानाच जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भारतीय जनता पक्षाचा डोलारा उभा राहीला असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना व्यक्त केले. प्रत्येकाची मळा उमेदवारी मिळावी अशी इच्छा असते. कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेले काम, जिंकण्याची क्षमता व वरिष्ठ पातळीवरून झालेले सर्व्हेक्षण या सर्व बाबींची पडताळणी करून ज्यांना उमेदवारी देणे शक्य आहे अशा सर्वांना उमेदवारी दिली जाईल. यात नवीन व जुना असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. याचे कारण म्हणजे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागावरच भारतीय जनता पक्षाचा डोलारा उभा राहीला असून पक्ष ही बाब कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
