निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्यांना आयुक्तांचा दणका... नवी मुंबईत तब्बल ७९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा
निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्यांना आयुक्तांचा दणका... नवी मुंबईत तब्बल ७९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा
२४ तासात कामावर हजर व्हा, अन्यथा पोलिसांत गुन्हे
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूक कामासाठी हजर न होणाऱ्या तब्बळ ७९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशाने कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसांमध्ये, संबंधित दांडी मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तासात नेमणूकीच्या ठिकाणी कामावर हजर व्हा, अन्यथा तुमच्याविरोधात पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या नोटीसांमुळे निवडणूक विषयक कामाबाबत नकारघंटा दर्शविणाऱ्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असतांना लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूकविषयक कामकाजाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला असून त्याअनुषंगाने प्रशासकीय कामकाजाला वेग आहे. याबाबत वरिष्ठांकडून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना आवश्यक त्या सुचना वा निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यानंतरही नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कामासाठी हजर गैरहजर राहत दांडी मारण्याचे प्रकार घडले आहेत. एकंदरीत ही परिस्थिती पाहता, निवडणूक विषयक कामावर हजर न राहणाऱ्या तब्बळ ७९ अधिकारी- कर्मचाऱ्यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तथानिवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशाने कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ही दि.१५ जानेवारी २०२६ रोजी होत असून निवडणूकीच्या कामकाजाकरीता विविध प्रधिकरणांच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाची नेमणूक केलेली आहे. एकूण २८ प्रभागांमध्ये १११ सदस्य संख्येकरिता ११५१ मतदान केंद्रे कार्यान्वित केली असून निवडणूकीच्या विविध कामांसाठी कर्मचाऱ्यांना नेमणूक पत्रेही दिलेली आहेत. तथापी या नेमणूक पत्रानुसार निवडणूक कामकाजाकरिता तब्बळ ७९ अधिकारी- कर्मचारी यांनी गैरहजर राहणे पसंत केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेतर्फेबजावण्यात आलेल्या या नोटीसांमध्ये, सदरची नोटीस मिळताच २४ तासाच्या आत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमणूकीच्या ठिकाणी हजर व्हावे, अन्यथा पोलीस स्टेशनमध्ये आपल्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येईल अशी स्पष्ट सूचना वजा इशारा देण्यात आला आहे.
निवडणूकीचे कामकाज हे कालमर्यादित व विहित वेळेत करावयाचे असल्याने सदर कामात अडथळा निर्माण होत असल्याचे तसेच निवडणूक कामात टाळाटाळ, हजगर्जीपणा व दिरंगाई करीत असल्याचे लक्षात घेजुन नोटीस मिळताच २४ तासाच्या आत नेमणूकीच्या ठिकाणी हजर व्हावे असे स्पष्ट निर्देशित करण्यात आले आहे.नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी महापालिका सर्वच बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देत असून याचाच एक भाग म्हणून आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सदरची ही कार्यवाही करण्यात येत आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
