Breaking News

नवी मुंबईतील स्वच्छतेच्या पाहणीसाठी... इंदोर महापालिका अभ्यास गटाची नवी मुंबई महापालिकेस भेट... !

नवी मुंबईतील स्वच्छतेच्या पाहणीसाठी... इंदोर महापालिका अभ्यास गटाची नवी मुंबई महापालिकेस भेट... !

स्वच्छता उपक्रमांसह आधुनिकता व नाविन्यपूर्णतेची केली प्रशंसा

नवी मुंबई (प्रतिनिधी) - स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत काही वर्षांपासून देशात सातत्याने पहिल्या 3 क्रमांकामध्ये अग्रभागी असणाऱ्या ४ शहरांची सुपर स्वच्छ लीग" ही एक विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आलेली असून त्यामध्ये नवी मुंबईसह मानांकित असणाऱ्या इंदोर महापालिकेतील अभ्यासगटाने नुकतीच नवी मुंबई महापालिकेस भेटदेवून येथील स्वच्छता आणि अभिनव स्वच्छता उपक्रमांची पाहणी केली. सदरची ही पाहणी करतांना त्यांनी नवी मुंबईत आधुनिक तंत्र  प्रणालीचा अंगीकार करुन करण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांची व कामांची प्रशंसा केली.

या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात त्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालय वास्तूच्या रचनेचे व तेथील अत्याधुनिक सुविधांचे आणि प्राधान्याने येथील स्वच्छतेचे कौतुक केले. दैनंदिन कचरा संकलन आणि वाहतुक प्रणालीचे नियमित निरीक्षण आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्थापित इंटिग्रेटेड कमांड आणि कंद्रेल सेंटरला भेट देऊन त्यांनी संपूर्ण प्रणाली जाणून घेतली. कोणते वाहन कुठे आहे, त्याने कोणत्या वेळी कुठल्या कचरापेटीतील कचरा संकलित केला यावर कचऱ्याच्या डब्यावरील मायक्रोचीपव्दारे तसेच वाहनावरील जीपीएस प्रणालीव्दारे नियंत्रण ठेवले जात असल्याची कार्यप्रणाली उत्तम असल्याचे अभिप्राय या अभ्यास गटाने दिले. तसेच या अभ्यास गटाने वस्त्र कचरा पुनर्प्रक्रिया केंद्राची पाहणी असता, ते प्रभावित झाले. नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये असलेल्या जगातील आठ आश्चर्यांच्या प्रतिकृतींमधून माहिती मिळते व मनोरंजनाच्या साधनांमधून संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र वेळ घालविण्याचे एक उत्तम माध्यम उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नेरूळ येथील रूग्णालयात सुरू असलेल्या कॅन्सर रजिस्त्रे आणि डायलेसिस केंद्राला भेट देऊन महापालिकेने महत्वाचा आरोग्य उपक्रम सुरू केल्याबद्दल विशेष कौतुक केले. कोपरखैरणे येथील जुनी क्षेपणभूमी बंद करून त्याठिकाणी फुलविलेले निसर्गोद्यान व तेथील मियावाकी शहरी जंगल प्रकल्प अतिशय उल्लेखनीय असल्याचे अभिप्राय त्यांनी दिले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक पाहून हे देशातील सर्वोत्तम स्मारकांपैकी एक असल्याचे अभिप्राय त्यांनी नोंदविले. एकंदरीत या पाहणी दौऱ्यानिमित्त नवी मुंबईच्या आतिथ्यशीलतेनेही भारावून गेल्याचे सांगत इंदोर शहराला नक्की भेट द्यावी असे आमंत्रणही त्यांनी दिले.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...