अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश!
अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश!
३५ किलो गांजासह ८ जणांची टोळी गजाआड
कल्याण (प्रतिनिधी) - अंमली पदार्थ विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांच्या परिमंडळ ३ कल्याण पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गांजा तस्करीप्रकरणी महात्मा फुले पोलीस आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत ८ मोक्काअंतर्गत सराईत आरोपींना गजाआड करत एकूण ३६ किलो वजनांचा गांजाचा साठा हस्तगत केला आहे.तर यातील आणखी ६ आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. डीसीपी अतुल झेंडे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि कल्याण शहर वाहतूक पोलिसांकडून कल्याण पश्चिमेच्या बळीराम सिंग परदेशी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी परिसरात नाकाबंदी लावली होती. त्यावेळी संशयास्पदरित्या आलेली छत्तीसगड ८ एएम ९४०१ क्रमांकाच्या बलेनो कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, कारचालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगात पुढे निघून गेला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांच्या पथकाने काही अंतरावर पुढे जाऊन सदरची गाडी अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये ३५ किलो गांजा आणि एक गावठी पिस्तूल आढळून आले होते. तर या गाडीतील मोहम्मद सरफराज मोहम्मद आसिफ याच्यासह मोहम्मद रफीक शेख, फैजान शेख, समीर अली, आसिफ सय्यद अशा ५ जणांना अटक केली. या सर्वांच्या चौकशीतून पोलिसांनी नंतर शाहीद अब्दुलगनी शेख, शाहीद शेख आणि रवींद्र मिर्धा या आरोपींना भिवंडी - नागपूर आणि ओडिसा राज्यातील आरोपींनाही अटक केली आहे.
सदरची ही कारवाई पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळीराम सिंग परदेशी, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विकास मडके, हवालदार महेंद्र मंझा, थेरे आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद झोडगे, शिपाई सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.
नागपुरात ४० हुन अधिक गुन्हे दाखल
सदरची ही सर्व टोळी नागपूर, अमरावती, भंडारा तसेच ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी सक्रिय असल्याचे तसेच त्यांच्यावर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत ४० पेक्षा गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
