Breaking News

डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून इसमाची निर्घृण हत्या; तिघे आरोपी अटकेत

डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून इसमाची निर्घृण हत्या; तिघे आरोपी अटकेत

कल्याण (वार्ताहर) - डोंबिवलीतील कोपर रेल्वे स्टेशनजवळ पूर्ववैमनस्यातून एका इसमाची निर्घृणपणे हत्या करण्याची घटना नुकतीच घडली. चाकूसह लोखंडी रॉडने ४० वार करून ही हत्या करण्यात आली असून पोलिसांनी १२ तासांत तिघा आरोपींना अटक केली आहे. डोंबिवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दि.१३ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आर. के. एस्टेट, कोपर रेल्वे स्टेशनजवळ जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी नरेंद्र उर्फ काल्या भालचंद्र जाधव (३७) याच्यावर कोयता, चाकू व लोखंडी रॉडने तब्बल ४० वार करत निर्घृण खून केला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून नरेंद्र जाधव यांना, तु यहाँ क्यों आया, अब यहा से जाने नहीं देंगे, तुझे यही खत्म कर देंगे अशी धमकी देत शिवीगाळ केली व त्यानंतर जाधव यांच्या डोक्यावर, मानेवर व गळयावर, छाती, पोट, पाठ तसेच हात-पायांवर प्राणघातक वार करण्यात आल्याने या हल्यात नरेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हल्ला थांबविण्यासाठी नरेंद्र यांचा मित्र शुभम राजेश पांडे (२७) हा मध्ये पडले असता, आरोपी आकाश बिराजदार याने तू बीच में आया तो तुझे भी खत्म कर देंगे अशी धमकी देत त्याच्या डोक्यावर चाकूने वार केला तर इतर आरोपींनीही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने शुभम पांडे गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला व वरिष्ठांच्या सूचनेनुसार तात्काळ विशेष तपास पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग काढण्यात आला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने दिवा वेस्ट परिसरात छापा टाकून अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार (२९) याच्यासह दिवाकर महेशचंद्र गुप्ता (१८) आणि आलिफ शहादाब खान (१८) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात जुन्या वैमनस्यातूनच हा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...