नवी मुंबई महापालिकेत भ्रष्ट व बेधुंद कारभार... !
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचा गंभीर आरोप
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेवर गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधीशिवाय कारभार चालविताना येथील अधिकाऱ्यांची मनमानी व भ्रष्ट पध्दतीने तिजोरीची लुट केल्याचा आरोप काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष (अजीत पवार गट) यांनी महापालिकेवर काढलेल्या मोर्चा वेळी केला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला, पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी होते. या मोर्चाने शेवटी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची भेट घेवून विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देत चर्चा केली. आयुक्तांनी वेळेवर भेट दिली नाही म्हणून कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली. अखेर मोर्चाला सामोरे जात आयुक्तांनी विविध प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सार्वजनिक प्रकल्प, वाहतूक समस्या, पर्यावरण संरक्षण आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील गंभीर मुद्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी करणारे व्यापक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नवी मुंबईतर्फे सादर करण्यात आले. हे निवेदन संपूर्णपणे जनहिताचे, न्याय्य आणि अत्यंत आवश्यक असून नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी थेट संबंधित असल्याचे आयुक्तांशी बोलतांना जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी सांगितले.
या निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने समान काम - समान वेतन, सफाई व माळी कामगारांच्या प्रलंबित समपद वेतन प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करावी, गटई व चर्मकार समाजासाठी विशेष धोरण राबवावे, अधिकृत परवाने, सुरक्षित जागा आणि उदरनिर्वाहासाठी संरक्षण देणारे धोरण तातडीने जाहीर करावे, लोकोपयोगी प्रकल्प नागरिकांसाठी खुले करणे, वाशी बस डेपोचे उदघाटन, ऐरोली सेक्टर ४ नाट्यगृह सुरू करणे, ऐरोलीसाठी आगरी-कोळी भवन (भूखंड, सभागृह, वाचनालय, प्रशिक्षण केंद्र) तसेच भूमिपुत्र व पारंपरिक व्यवसायिकांसाठी बाजारपेठ, स्थानिक व्यवसायिकांना मार्केट, शॉप्स वितरणासाठी स्वतंत्र धोरण लागू करणे, फेरीवाले व भाजी विक्रेत्यांसाठी बाजार संकुल, नियोजित बाझार संकुल, मार्केट यार्ड आणि सुरक्षित जागांची निर्मिती करणे, ऐरोली-मुलुंड मार्गावर जड वाहन बंदी करणे, ६ ते १० यावेळेत जड वाहतूक थांबविणे, झोपडपट्टी पुनर्वसन, अडकलेले पुनर्वसन प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे, अयोग्य पात्रतेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, खाजगी रुग्णालयांच्या अनुचित शुल्कावर नियंत्रण आणणे, दरफलक लावणे, अचानक तपासणी आणि नियमभंगावर दंड आकारणे, तिकिट मशीन, स्कॅनर, बस ट्रॅकिंग प्रणालींच्या तांत्रिक त्रुटी त्वरित दुरुस्त करणे. महिलांसाठी सुरक्षित स्वच्छतागृहे निर्माण करणे आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. याशिवाय बसस्टॉप, स्टेशन, मार्केट, उद्याने येथे स्वतंत्र महिला स्वच्छतागृहे, सीसीटिव्ही व सुरक्षा, खाडी व कांदळवनातील अवैध डेब्रिजवर कारवाई करणे, कोस्टल टास्क फोर्स सक्रिय करून भूमाफिया नियंत्रित करणे, शहरातील पार्किंग समस्येवर उपाय, बहुमजली पार्किंग इमारती व डिजिटल पार्किंग प्रणाली लागू करणे, कोपरखैरणे स्टेशनजवळ बस सेवा व नवीन बस स्टॉप व बस मार्ग सुरू करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा, आरोग्य, वाहतूक व पर्यावरणाचा प्रश्न तातडीचा असून प्रशासनाने त्वरित आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
