Breaking News

डोंगररांगांना नो-डेव्हलपमेंट झोन घोषित करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी

डोंगररांगांना नो-डेव्हलपमेंट झोन घोषित करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) - गायब होणाऱ्या टेकड्या वाचवा हा संदेश समाजातील सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने खारघर वेटलँड्स अँड हिल्स ग्रुप, अनुभूती ३६५ डेज आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन, वन विभाग-पनवेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील टेकड्या वाचविण्यासाठी पर्वत दिन मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विशेषकरून पांडवकडा धबधब्यांचे संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक मोहीम आणि चढावावर सायकल रॅली हे दोन उपक्रम दि.११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत. या मोहिमेची या वर्षीची जागतिक थीम पाणी, अन्न आणि उपजीविकेला आधार देण्यात हिमनद्यांची भूमिका अधोरेखित करते. सध्यस्थितीत नवी मुंबई मोठी चिंता हे पर्वतांवरील टेकड्यांचे धोक्यात आलेले अस्तित्व हे आहे. अनियंत्रित उत्खनन, सपाटीकरण आणि रिअल-इस्टेट योजना आदी कारणांमुळे नैसर्गिक टेकड्यां गिळंकृत होत आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार म्हणाले की, सर्वत्र पर्वतांना संरक्षणाची आवश्यकता असताना, नवी मुंबईला प्रथम स्वतःच्या नाजूक टेकड्या वाचवाव्या लागतील. पुढील नुकसान टाळण्यासाठी सर्व स्थानिक डोंगररांगांना कडक नो-डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.

खारघर वेटलॅड्स अँड हिल्स फोरमच्या संयोजक ज्योती नाडकर्णी यांनी पांडव कडा धबधब्याचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दि.११ डिसेंबर रोजीच्या या कार्यक्रमात स्थानिक डोंगरांच्या जैवविविधतेवर जागरूकता सत्र, खारघर पर्वतरांगांवर छायाचित्र प्रदर्शन आणि पांडव कडा पुनर्संचयित करण्यासाठी आणि लॅडस्केपचे संरक्षण करण्यासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. तर रविवार, दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित दुसऱ्या उपक्रमा अंतर्गत उत्सव चौक ते फणसवाडी पर्यंत एक चढाई सायकलिंग रॅलीचे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे. ज्ञानमगंगा चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्या टॅंडम सायकलसह यावेळी या मोहिमेत सामील होतील. यात एक दृष्टिहीन सायकलस्वार स्वार असेल. डोंगराळ परिसंस्थेशी जोडलेल्या पारंपारिक पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी हे सायकल स्वार आदिवासी कुटुंबांना देखील भेटणार आहेत. अनुभूती३६५ डेजचे संचालक सुदीप आठवले यांनी, आपल्याला खरोखर पृथ्वीचे रक्षण करायचे असेल तर पर्वतांचे रक्षण करण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे गरजेचे असल्याचे त्यांनी नमुद केले.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...