Breaking News

करावेत नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्याची मनसेची मागणी

करावेत नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्याची मनसेची मागणी

नेरुळ (वार्ताहर) - करावे विभागातील पालकांचा आपल्या पाल्यांचे महापालिकेच्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत ही बाब लक्षात घेता, करावेगावात नवी मुंबई महापालिकेने नवीन सीबीएसई शाळा सुरु करण्याची आग्रही मागणी मनसेचे शहर सचिव सचिन कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. सीवूड्स से-५० (पश्चिम) येथे नवी मुंबई महापालिकेची ९३ क्रमांकाची सीबीएसई शाळा आहे. परंतु करावे पासून या शाळेचे अंतर जास्त असल्याने बहुसंख्य करावे गावातील मुलांना या शाळेत प्रवेश मिळत नसल्याने येथील मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. एकंदरीत ही गंभीर बाब लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने करावेगाव येथे महानगरपालिकेची सीबीएसई शाळा बांधावी अशी आग्रही मागणी मनसेचे शहर सचिव सचिन कदम यांनी महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात कदम यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेवून सदरचे निवेदन त्यांना सादर केले. दरम्यान, मनसेच्या या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे शहर सचिव सचिन कदम, मनविसे विभागसचिव शंकर घोंगडे-पाटील, मनसे शाखाअध्यक्ष गणेश पाटील, उपशाखा अध्यक्ष संतोष मोटे, किरण बेडेकर, राजेश शिर्के, अनिकेत शिरे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...