लोकनेते दिबांच्या नावासाठी संसद भवन आवारात राज्यातील खासदारांची निदर्शने
लोकनेते दिबांच्या नावासाठी संसद भवन आवारात राज्यातील खासदारांची निदर्शने
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीबाबत भूमिपुत्रांच्या भावना तीव्र आहेत. मात्र त्यानंतरही विमानतळाच्या नामकरणाबाबत सरकारकडून विलंब होत असल्याने भूमिपुत्रांमध्ये नाराजीचा सुर उमटत असतांनाच काल बुधवारी संसद भवनाच्या आवारात महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या खासदारांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. भिवंडीचे खा.सुरेश (बाळया मामा) म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या तथा ज्येष्ठ महिला खा.सुप्रिया सुळे व इतर खासदार यावेळी उपस्थित होते. भूमिपुत्रांच्या सन्मानाचा आणि न्यायाचा हा लढा मागील अनेक वर्षांपासून सुरू असून, आजच्या आंदोलनातून पुन्हा एकदा केंद्र सरकारसमोर आमची ठाम भूमिका नोंदवण्यात आली असल्याचे यावेळी खा. म्हात्रे यांनी सांगितले.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
