अखेर भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री कविता कटकधोंड यांची पदावरून उचलबांगडी
अखेर भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री कविता कटकधोंड यांची पदावरून उचलबांगडी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - आगरी समाजाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा महामंत्री कविता कटकधोंड यांना चांगलेच भोवले आहे. कविता कटकधोंड यांनी आगरी समाजाबद्दल केलेल्या विधानाची दखल घेत, नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासह कविता कटकधोंड यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. नवी मुंबई भाजप जिल्हा महामंत्री कविता कटकधोंड यांनी काही दिवसांपूर्वी आगरी समाजाबाबत वादग्रस्त वक्व्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताच, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी अधिकृत पत्रक काढून कटकधोंड यांची पदावरून तात्काळ उचलबांगडी केली आहे. यासंदर्भात नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई जिल्हा महामंत्री म्हणून कार्यरत असलेल्या कविता कटकधोंड यांनी आगरी समाजाबाबत केलेल्या विधानाचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करतो. नवी मुंबईचे निर्माण भूमिपुत्रांच्या त्याग व परिश्रमातून झाले असून त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही, ही भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे.नवी मुंबईत आगरी-कोळी समाजासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तसेच देशभरातून आलेले नागरिक सौहार्दाने एकत्रितपणे राहतात. या सर्व समाजांच्या योगदानामुळेच नवी मुंबईची प्रगती व प्रतिष्ठा सातत्याने वाढत आहे. म्हणूनच, कविता कटकधोंड यांच्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही. पक्ष त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करत असून, त्यांना जिल्हा महामंत्री या पदावरून तात्काळ पदमुक्त करण्यात आले असल्याचे नमूद केले आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
