Breaking News

नाताळनिमित्त बाजारपेठ सजली...

नाताळनिमित्त बाजारपेठ सजली...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नाताळ हा सर्ण सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषकरून बच्चे कंपनीमध्ये या सणाचे विशेष आकर्षण असते. अवघ्या काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असल्याने नवी मुंबईसह पनवेल, ठाणे व इतर विविध ठिकाणच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या सेलीब्रेशनची आतापासूनच जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. नाताळ जवळ आल्याने शहरांतील बाजारपेठा, दुकाने व मॉल्स ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी लाईट्स, बेल्स, स्टार्स, सांताच्या टोप्या, केक, सजावटीच्या वस्तू आदी साहित्यांनी सजल्या आहेत. यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्यास्थितीत बाजारपेठेत सजावटीच्या वस्तूंमध्ये विविध आकारांचे ख्रिसमस ट्रो, जिंगल बेल्स, विद्युत माळा (लाईट्स), स्टार्स, टिनसेल, बॉल्स आणि स्टॉकिंग्ज, ख्रिस्त जन्माचे साहित्य, मुखवटे आणि सांताक्‍्लॉजच्या टोप्या दाखल झाल्या आहेत.तसेच खाद्यपदार्थांमध्ये विविध फ्लेवर्सचे केक, विशेषतः प्लम केकची मागणी जास्त असते. त्यामुळे हे केक उपलब्ध करून देण्यावर दुकानदारांकडून भर दिला जात आहे. विशेषकरून लहान मुलांसाठी बाजारात सांताक्‍्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असल्याने चॉकलेट गिफ्ट घेवून येणाऱ्या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी आतापासून होतांना दिसत आहे. काही ठिकाणी साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे, तरीही उत्साहामुळे खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे.


Most Popular News of this Week