दुबार मतदारांबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष करणेबाबत पनवेल महापालिका प्रयत्नशील
दुबार मतदारांबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष करणेबाबत पनवेल महापालिका प्रयत्नशील
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार नावाबाबत तपासणी करून मतदार यादी निर्दोष करण्यासाठी काल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी पनवेल महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे व निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार यांनी सर्व ४६१ मतदान केंद्र स्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिले. यावेळी पनवेल निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले की, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना यांची पडताळणी करून व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी महापालिका सर्वतोपरी कार्यवाही करणार आहे. यावेळी उपस्थित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.), पर्यवेक्षक, महानगरपालिका कर्मचारी यांना मतदार यादीतील दुबार नावे बी.एल.ओ. अँपच्या मदतीने शोधून सदर मतदार दुबार असलेबाबत खात्री करणे विषयक तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुबार मतदारांबाबत करावयाच्या कार्यवाहीविषयी सूचना देण्यात आल्या. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील एकूण ४६१ मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने महापालिकेने पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. प्रारुप मतदार यादीवरील प्राप्त हरकती व सूचना तसेच दुबार मतदारांबाबत तपासणी करून मतदार याद्या अधिक निर्दोष होतील यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. - मंगेश चितळे, आयुक्त तथा प्रशासक, पनवेल महानगरपालिका
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
