लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी; ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंती
लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी; ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंती
पनवेल (वार्ताहर) - सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत असल्याचे दिसून येत आहे. लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची पंगत जमिनीवर त्यानंतर खुर्ची टेबलावर व आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे . लग्न सराईच्या हटके पद्धतीत बुफे पद्धतीला मान देण्यात येत असल्याने ग्रमीण भागात सुद्धा पंगतीच्या जागी बुफे पद्धत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सभागृहासह ओपन लॉनवर शुभ मंगलला पसंती मिळत आहे. त्या जोडीला संगीतमय मंगलाष्टकांची रेलचेल आहे. बाहेरील बाजूस फोटो सेक्शनसाठी विविध आकर्षक सजावट करण्यात येत असून लग्न समारंभ हा इन्हेंट ठरत आहे. पूर्वी तुलसी विवाहनंतर खऱ्या अर्थाने लग्न सराईला सुरुवात व्हायची व त्यानंतर बाजारपेठांमध्ये लग्नरसराईचा साज चढत असे . विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलकर बाजारपेठसह देण्याघेण्याच्या वस्तू साठी मुंबई-दादर, पुणे आदी ठिकाणी जात असल्याने वधूवर कडच्या मंडळींची गर्दी दिसून येत असे.
या लग्न सराईसाठी पनवेल परिसरातील सभागृहासह लॉन, हॉटेल व्यवसायिक सज़ झाले आहेत. सद्य स्थितीत लग्नाचा ट्रेंड बदलत चालल्याने लॉनच्या मोकळ्या जागेत सायंकाळी बहुतांशी लग्न उरकण्यात येत आहे. याठिकाणी विविध पदार्थ याची रेलचेल असते मोठ्या शहरातील शाही विवाहाची परंपरा ग्रामीण भागात रुजू पाहत असल्याने या ठिकाणी राबणाऱ्या अनेक जणांना सुगीचे दिवस आले आहेत. लग्न सराईमध्ये जेवणावळीमध्ये पंजाबीसह चायनीज पदार्थाची रेलचेल आहे. त्याच्या जोडीला जेवणावळीनंतर पान-मसालासह आईस्क्रीम जोडीला असते. त्यामुळे मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा ही पद्धत जोर धरू लागली आहे.
सध्या लग्नाचे स्वरूप बदलते होत असून हटके लग्न सराई करण्याकडे अनेकांचा जोर आहे. त्यातच वेगवेगळे इव्हेंट, संगीत, संगीत पार्टी आदी प्रकार वाढत चालले आहेत. पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग मैदान तर तालुक्यातील राज रिसॉर्ट, विसावा रिसॉर्ट, रिहाना फार्म हाऊस, काकाजींनी वाडी, छाया रिसॉर्ट , आयुष्य रिसॉर्ट आदी कडे विवाह सोहळा करण्याकडे लोकांचा कल असून या ठिकाणी सहा सहा महिने अगोदरच बुकींग करावी लागत आहे.
नव वर्षात विवाहासाठी एकूण ५९ शुभ मुहूर्त
यावर्षी १६ नोव्हेंबरपासून लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून ६ मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये २ व ५ रोजी मुहूर्त आहेत तर २०२६ हे वर्ष लग्न आणि शुभ कार्यासाठी खूपच चांगले असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. २०२६ या वर्षात एकूण ५९शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे या शुभमुहूर्तावर लग्न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
