Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला

मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा दि. ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्थभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख दि. २२ फेब्रुवारी २०२६ जाहीर केली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.



Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...