सिडकोमध्ये संविधान दिन साजरा
सिडको महामंडळाचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन येथे बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री. गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. सुरेश मेंगडे, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, श्री. विनू नायर, व्यवस्थापक (कार्मिक), सिडको, श्री. प्रशांत भांगरे, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना), सिडको, श्री. सुभाष पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, श्री. नितीन कांबळे, अध्यक्ष, बी सी एम्प्लॉईज असोसिएशन तथा सरचिटणीस, सिडको एम्प्लॉईज युनियन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी श्री. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेतर्फे संविधानाचा स्वीकार करण्यात आला. या घटनेचे स्मरण म्हणून तसेच भारतीय नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
