Breaking News

नवी मुंबईतील वर्दळीचे मुख्य रस्ते व एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवर धूळ प्रतिबंधक सखोल स्वच्छता मोहीमा

नवी मुंबईतील वर्दळीचे मुख्य रस्ते व एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांवर धूळ प्रतिबंधक सखोल स्वच्छता मोहीमा

नवी मुंबईतील वायू प्रदूषणावर प्रतिबंध आणण्याकरिता तत्परतेने ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी काल विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्यास अनुसरुन लगेचच कालपासूनच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली असून रस्त्यांच्या कडेला साठलेली माती व्यवस्थित स्वच्छ करुन ती उचलून नेण्याची व त्याव्दारे हवेतील धूळ कमी करण्याची कार्यवाही युध्द पातळीवर हाती घेण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यक्षेत्रात शहर अभियंता शिरीष आरदवाड व घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त श्री. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता करण्यात येत आहे.

या अंतर्गत प्राधान्याने शहरातील ठाणे बेलापूर मार्ग, आम्र मार्ग तसेच एमआयडीसी क्षेत्र येथील मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. याकरिता प्रथमत: वायर ब्रश झाडू व फ्ल‍िपर मशीनव्दारे रस्त्यांच्या कडेला असलेली माती एकत्र केली जात असून ती लगेचच उचलून घेतली जात आहे व वाहून नेली जात आहे. त्याचप्रमाणे सदर माती  व धूळ साफ केलेला रस्ता यांत्रिकी वाहनाव्दारे व स्प्रिंकलर वाहनाव्दारे तसेच जेट स्प्रे वाहनाव्दारे पाणी मारुन धुवून घेतला जात आहे. याशिवाय वर्दळीच्या चौकांमध्ये  एनकॅपच्या डस्ट सप्रेसर (फॉगर्स) वाहनाव्दारे पाण्याचे फवारे हवेत मारुन हवेतील धूलीकण जमिनीवर येतील अशी  धूळ प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. महत्वाचे म्हणजे रस्ते धुणे व हवेत पाण्याचे फवारे मारणे यासाठी अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील शुध्द केलेले प्रक्रियाकृत सांडपाणी वापरले जात आहे.

यामध्ये आज शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रातील तुर्भे विभागात साऊथ सेंट्रल रोड, घणसोली विभागातील साऊथ फीडर रोड, महापे कोपरखैरणे रोड तसेच इतरही मुख्य रस्त्यांची सखोल साफसफाई करण्यात आली.

हिवाळा कालावधी आणि वायू प्रदुषणामुळे हवेतील धूरक्याचे प्रमाण वाढलेले दिसत असून त्यावर नियंत्रणासाठी मुख्य रहदारीचे रस्ते व एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते यांच्या सखोल स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वच विभागात सखोल स्वच्छता मोहीमा हाती घेण्यात आल्या असून त्यासोबत बांधकाम साईट, दगडखाणी व सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट या ठिकाणच्या धूळ प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभाग कार्यालय पातळीवर विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दक्षता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अभियंते, स्वच्छता अधिकारी व निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. या पुढील काळात नियमितपणे ही सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याकडे काटेकोर लक्ष देण्यात येत आहे.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...