Breaking News

तळवली येथील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा

तळवली येथील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडका सिडकोतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार सिडकोच्या नवी मुंबई अनधिकृत बांधकाम विभाग यांच्या पथकाने काल घणसोली नोड से-२१ येथील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली.

या कारवाईदरम्यान घणसोली नोड से-२१, मौजे तळवली सर्व्हे नं-५७,५८ व ५९ येथे सुमारे ३५५.०० चौं. मी जागेवर उभारण्यात येत असलेल्या आरसीसी फ्लोटिंगच्या अनधिकृत चालु बांधकामावर कारवाई करून सदरचे क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. सदरचे हे अनधिकृत बांधकाम सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून, सिडको महामंळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. यासंदर्भात सिडकोतर्फे अनधिकृत बांधकामधारक भूषण चौधरी यास नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही सदरठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्याचे सत्र सुरुच असल्याने काल अखेरीस सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून सदरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा मारला.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...