खाजगी इस्पितळांकडून रूग्णांची होणारी लुट थांबविण्यासाठी नवी मुंबईत राष्ट्रवादीची अनोखी बॅनरबाजी... डॉक्टरांनो, रुग्णांना इतके लुबाडू नका; कर्माची फळे इथेच भोगायची आहेत! राष्ट्रवादी काँग्रेस (अप) जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचे शहरातील डॉक्टरांना आवाहन
खाजगी इस्पितळांकडून रूग्णांची होणारी लुट थांबविण्यासाठी नवी मुंबईत राष्ट्रवादीची अनोखी बॅनरबाजी... डॉक्टरांनो, रुग्णांना इतके लुबाडू नका; कर्माची फळे इथेच भोगायची आहेत! राष्ट्रवादी काँग्रेस (अप) जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचे शहरातील डॉक्टरांना आवाहन
नवी मुंबई (प्रतिनिधी) - खाजगी इस्पितळात आपल्यावरील आजारासाठी एखादा रूग्ण दाखल झाल्यावर अशा रूग्णांकडून उपचाराच्या नावाखाली विविध बाबतीत अवास्तव रक्कमेचे देयक लादून रूग्णांसह त्याच्या नातेवाईकांना लुबाडण्याचे प्रकार आजमितीस सर्वत्र सुरु आहेत. एकविसाव्या शतकातील आधुनिक शहरांमध्ये विविध ठिकाणी असलेल्या नामांकित इस्पितळांमध्ये रूग्णांची लुबाडणूक होण्याचे प्रकार होतांना दिसत आहे. ही बाब लक्षात घेवून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी शहराच्या विविध भागात असलेल्या खाजगी इस्पितळांबाहेर अनोखी बॅनरबाजी केली आहे. डॉक्टरांनो, रुग्णांना इतके लुबाडू नका; कर्माची फळे इथेच भोगायची आहेत अशा स्वरूपाचे जनजागृतीपर आवाहन या बॅनर्सव्दारे खाजगी डॉक्टरांना केले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या खाजगी इस्पितळांबाहेर लावलेल्या या अनोख्या बॅनर्समध्ये प्रामुख्याने, डॉक्टरांनो, रूग्णांना इतके लुबाडू नका... एकदिवस आपल्या सर्वांना देवाच्या घरी जायचे आहे, आपल्या कर्माची फळे इथेच भोगायची आहेत. असा एकप्रकारे सल्ला देण्यासह अशा स्वरूपाची लुट न करण्याचे आवाहन केले आहे. याविषयी माहिती देतांना जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी सांगितले की, महापालिका कार्यक्षेत्रात जे खाजगी इस्पिळ आहेत. त्या इस्पितळात रूग्णांचे दर निश्चित नाहीत. वेगवेगळे दर लावून अशा इस्पितळांमध्ये रूग्णांची लुट केली केली जाते. सध्या महापालिकेत आयुक्त हे प्रशासक असून, नवी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागाचे या प्रकाराकडे लक्ष देतांना दिसत नाही. महाराष्ट्राचा आरोग्य विभाग तर फार लांब आहे. नवी मुंबईतील कुणाला विशेषकरून राजकीय पुढाऱ्यांना याबाबतची चिंता नाही. नेरुळमध्ये एका रूग्णाला ब्रेन हॅमरेज झाला होता. आतापर्यंत या रूग्णांचे ३० लाखांहून अधिक रक्कम भरून घेण्यात आली आहे. मात्र अजूनही सदरचा रूग्ण शुध्दीवर नसतांना अशा रूग्णांवर उपचार करून वेगवेगळे दर आकारणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावरून खाजगी डॉक्टरांकडून होणारी लुटमार काही केल्या थांबतांना दिसत नाही. कोरोनात या लोकांनी २५ ते ३० लाखांची बिले लादली होती. या बॅनरबाजीव्दारे इस्पितळांविरोधात माझी भूमिका नाही. मात्र डॉक्टरसुध्दा माणूस असल्याने त्यांचे अंतर्मन माणसाचे मग रूग्ण व डॉक्टर असा भेदभाव का? असा सवाल या बॅनरबाजीव्दारे उपस्थित करून मी याव्दारे शहरातील डॉक्टरांमध्ये माणूसकीची भावना निर्माण करणे हे असल्याचे नामदेव भगत यांनी सांगितले. डॉक्टर लोकांनी रूग्णांची लुट करू नये हा या मागील माझा हेतु आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे भगत यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केलेल्या या जनजागृतीपर बॅनरबाजीनंतर शहरातील खाजगी डॉक्टर्स नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
