Breaking News

वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्यासह तापाचे रूग्णांत वाढ

वातावरण बदलामुळे सर्दी खोकल्यासह तापाचे रूग्णांत वाढ

नवी मुंबई (प्रतिनिधी) - बोचरी थंडी, धुळीचे वादळ, वाढलेले प्रदूषण आदी कारणांमुळे मुंबई ठाण्याप्रमाणेच नवी मुंबईतही धसनविकारांचा ताप वाढला असल्याचे दिसून येत आहे. ताप, सर्दी, खोकला, श्वसनविकार यांसह दम्याच्या तक्रारीही रूग्णांमध्ये वाढतांना दिसत आहे. विशेषत: ओलसर हवेमुळे नाक- कानातील बुरशी जन्य इनफेक्शनचे प्रमाणही अधिक दिसत आहेत. नवी मुंबईत अशा स्वरूपाचे रूग्ण महापालिकेच्या इस्पिळांसह खाजगी इस्पितळांमध्ये उपचारासाठी धाव घेतांना दिसत आहे.दम्यासारखा आजार असलेल्या रुग्णांना पुन्हा त्रास होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर अधिक असल्यामुळे अनेक रुग्णांना सर्दी, खोकला, घसादुखी यासारखी लक्षणे दिसत आहेत. थंडीमुळे दम लागणे, ध्वास घेण्यात त्रास होण्यासारख्या तक्रारीही वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. ज्या रुग्णांना तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप, घसादुखी यासारखी लक्षणे दिसत आहेत,त्यांनी वेळीच उपचार करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. दमा तसेच ध्वसनविकार असलेल्या रुग्णांना संसर्गापासून दूर राहण्यासाठी अधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. उबदार कपडे घालणे, मसालेदार तळलेले पदार्थ न खाणे, झेपेल इतकाच व्यायाम, वेळेवर औषधे घेणे, आजाराची तीव्रता वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. चालताना, बोलताना धाप लागणे, श्वास जड झाल्यासारखे वाटणे किंवा कोंडल्यासारखे होत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. बोचरी थंडी दम्यासाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे योग्यवेळी वैद्यकीय उपचार घ्यावेत. दम्याचा विकार कायमस्वरूपी फुफ्फुसांमध्ये गुंतागुंतीचे विकार निर्माण करण्यास मदत करतो. त्यामुळे लक्षणांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांकडून स्पष्ट केले जात आहे.

हे उपाय अधिक उपयुक्त - आजार टाळण्यासाठी मास्कचा वापर करणे, कोमट पाणी पिणे, घरात तसेच आसपासच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे,थंड हवा तसेच धुळीपासून दूर राहणे हे उपाय अधिक उपयुक्त ठरतात. दम्याच्या रूग्णांनी योग्यवेळी औषधे घ्यावीत व लक्षणांची तीव्रता कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्वत:च्या मनाने उपचार करणे धोकेदायक - तज्ज्ञांच्या मते थंडीत स्वत:च्या मनाने नाक अथवा कानात तेल, तूप टाकणे धोकादायक ठरू शकते. चुकीचा थेंब कानातील पडद्याला हानी पोहचवू शकते.त्यामुळे कान व नाक यासंबंधीत आजाराबाबत कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.


Most Popular News of this Week

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...

गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...

पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...

नवीन पनवेलमध्ये...

अध्यक्षांच्या मुलासह बाहेरील तरुणांनी मारहाण केल्याचा रहिवाशांचा...

मानधन व भत्ते करणार महापौर...

पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...

हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...

बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...

विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...