वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित
वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित
वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित
मुंबई,: भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निलंबित केले.
अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गंभीरपणे लक्ष द्यावे.
चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री, महाराष्ट्र.
विशेष म्हणजे, नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत व संबंधित आरोपीवर कारवाई होण्याबाबत तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विधानसभेत लक्षविधी उपस्थित करण्यात आली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात गौण खनिज प्रकरणी चौकशी केली असताना पर्यावरण विभागाची अनुमती नसताना वाळू घाटांमधून वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. हा प्रकार गंभीर असून याबद्दलची सर्वंकष चौकशी केल्यावर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.
Most Popular News of this Week
केडीएमसीच्या 'आय' प्रभागात...
सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) -...
गुरुवारी ठाण्यात पाण्याचे...
पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिकेचे आवाहन ठाणे (वार्ताहर) – ठाणे...
मानधन व भत्ते करणार महापौर...
पनवेल महापौरांचा समाजाभिमुख निर्णय... पनवेल (वार्ताहर) – समाजहित आणि...
हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनी...
बाहेरील नोकर भरतीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी व भूमिपुत्रांवर अन्याय उरण...
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी...
विलंब दंडावर मिळणार ५० टक्के सवलत ३१ मार्च पर्यंत घेता येणार योजनेचा...
